Monday, April 19, 2010

आबा


डोंबिवली रा.स्व.सं.च्या इतिहासातील एका सोनेरी पानाच्या अत्यंत दुर्दैवी व करुण अशा दीर्घकथेचा अखेर पूर्णविराम झाला..संघात व्यक्तीला आदर्श मानीत नाहीत, परन्तु माझ्यासारख्या त्यावेळच्या तरुणांची एक मोठी पिढीच २ आबांकडे पहात-पहात संघकाम शिकली. एक आबा दातार व दुसरा आबा जोशी... माझ्या प्रचारक जीवनाचा प्रारंभ बिंदु, मनातील प्रारंभीची उत्कट प्रेरणा म्हणजे केवळ ’आबा’.. !
अविनाश दत्तात्रय जोशी - एक गोरंपान, ऊंचपुरं विविधांगी कर्तृत्व गाजवणारं प्रसन्न व्यक्तिमत्व ! उत्कृष्ठ गीत गावं तर आबाने, उत्कृष्ठ दंड फिरवावा तर आबाने, उत्कृष्ठ आनक वाजवावा तर आबाने आणि उत्कृष्ठ भाषण कराव तर ते ही आबानेच!जे करणार ते उत्कृष्ठ नि दर्जेदारच ! असा आपला आबा...
नगरपालिकेच्या मैदानावर भरणाया आमच्या छत्रपति सायं या जबरदस्त शाखेचा आबा जबरदस्त मुख्यशिक्षक ! शालेय वयातच जबाबदारी आलेला. योगायोगाने आबा ११ वीत असतानाच डोंबिवलीला माध्यमिक शालान्त परिक्षेचे केन्द्र सुरु झाले. पहिल्याच वर्षी डोंबिवली केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला तो आबानेच व तो ही संघकामाची जबाबदारी असतानाच ! आबा तुला हे सार जमत तरी कस ?अस विचारल्यावर आबा सहजतेने सांगत असे.. "ज्या क्षणी मी अभ्यासाच पुस्तक उघडतो त्याच्या दुसयाच क्षणापासून तहान, भूक, शाखा, मित्र, साहित्य, संगीत इतकच काय आजुबाजुला असणार सार जगच मी विसरलेला असतो. केवळ दुसयाच क्षणापासून संपूर्ण एकाग्रता.
आपल्याला कधी अभ्यासाचा कंटाळा आला, शाखेतील कामात मरगळ आली, उद्विग्नता आली कि बिनधास्तपणे आबा कडे जाव आणि पुन्हा प्रसन्नचित्त होऊन परताव असा माझा परिपाठच होता..आबाच्या नेतृत्वाखाली झालेले पौर्णिमेच्या चांदण्यातील चंदनाचे कार्यक्रम, शाखा-शाखांचे कबड्डीचे सामने, शरीर व मने चिंब भिजवणाया वर्षा सहली, पावसाळ्यात तुडुंब भरणाया प्रत्येक विहिरीत मनसोक्त डुबक्या मारण, ताला-सुरांच्या साथीने रात्र रात्र रंगवलेल्या संघ गीतांच्या मैफिली.. हे सारे उपक्रम आबाच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाचे निदर्शक होते. आबाची काळानुरूप प्रयोगशीलता थक्क करणारी होती. ७४ च्या अणुस्फोटा नंतर लगेचच शाखेतील सर्वांसाठी आबाने एक बौद्धिक वर्ग आयोजित केला. विषय होता "अणुबॉम्ब.. भारताने केलेला स्फोट". अणुबॉम्बची संपूर्ण तांत्रिक, वैद्न्यानिक माहिती, तसेच त्याचे होणारे भौगोलिक व ऐतिहासिक परिणाम यांच सुंदर विवेचन सर्व बाल-तरुणांसमोर मांडल...चन्दू पेंढारकर, बाळ भिसे, सदा खंडागळे, बाळ पुराणिक, मोहन दातार, आबा जोशी, बाळ ढापरे हे जीवापाड मैत्री असणारे त्या काळातील शखेतील तरुण म्हणजे एकरस हिन्दु समाजाच सक्षात उदाहरणच सर्वांसमोर होत.
आबा
एम. एस. सी .विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. विद्यापीठात दुसरा आला अन लवकरच आबाचा निरोप समारंभ ठरला.बयाच मोठ्या कालखंडानंतर डोंबिवलीतून एक गुणवान, धडाडीचा तरुण संघप्रचारक म्हणून बाहेर पडत होता. प्रारंभी भिवंडी व नंतर कुलाबा जिल्हा प्रचारक म्हणून आबाने काम केल आणि त्यानंतर डोंबिवलीतून प्रचारक जाणायांची एक मालिकाच सुरू झाली.
आबाला अत्यन्त बुद्धिमान व सामाजिक जाणीवा प्रगल्भ असलेल्या आई-वडिलांचा वारसा मिळाला. आणि पुढे आबाइतक्याच गुणांनी, प्रखर बुद्धिमत्तेनी, सामाजिक कार्यातील सहभागानी कर्तृत्ववान अशा - मुंबई विद्यापीठात तत्वद्न्यान विषयाच्या प्रमुखपदी असलेल्या शुभदाताईंची जीवनसाथ मिळाली. या दोघा प्रतिभावान माता-पित्यांच प्रतिबिंब उमटलेली मुले अमोघ व वेदवती... तितकाच समर्थ असा ज्येष्ठ बंधु अनिलराव यांचा परिवार नि महाडच्या जोशी घराण्यात हा वारसा पुढे चालविणाया त्या वेळच्या अभाविप च्या कार्यकर्त्या भगिनी अरुणाताई... अस हे मातृछायातील जोशी कुटुंब म्हणजे ६०-७०-८० च्या काळातील संघकार्यकर्त्यांच एक हक्काच, वर्दळीच आश्रयस्थान होत.
डोंबिवलीतील महाविद्यालयात आबाने व्याख्याता म्हणून प्रवेश केला आणि त्याच्या जीवनातील दुर्दैवाचा आलेख सुरू झाला.कोणकोणत्या व्याधी आबाला जडल्या नि घरच्यांनी काय काय प्रकारे उपचारांची शर्थ केली त्याच तर वर्णन करणच कठिण आहे. ज्यांनी खळाळत्या प्रवाहाप्रमाणे असलेला आबा पाहिला होता त्याना अलिकडे पुतळ्या प्रमाणे स्तब्ध झालेली आबाची मूर्ति पाहून आतून भडभडून येत असे.
आज आबा शरीराने सुदृढ असता तर प्रांतिक, अ.भारतीय स्तरावर.. कदांचित विश्व विभागाच्या कामातही मोलाची भर पडली असती. अशी गगनाला गवसणी घालण्याची क्षमता अंगी असणाया आबाची विकल शारीरिक स्थितीतून, दुर्दैवी नि करुण अशा अवस्थेतून अखेर परमेश्वरानेच सुटका केली... ... मला खात्री आहे, नव तेज, नवी कांती घेऊन पुन्हा आबा आपल्यात येइल.. सुदृढ संघकार्य अन विकसित भारताच्या निर्मितीत आपणा सर्वांच्या हातात हात गुंफण्यासाठी... .. ...

1 comment:

  1. मला आधीपासूनच खात्री होती! फक्कड!!

    ReplyDelete